esakal | धक्कादायक ! भारतीय वटवाघुळांमध्येही सापडले कोरोना विषाणू...
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक ! भारतीय वटवाघुळांमध्येही सापडले कोरोना विषाणू...

कोरोना व्हायरस संपूर्ण जगात वाऱ्यासारखा पसरत चालला आहे. हा व्हायरस आधी वटवाघुळांच्या शरीरात होता आणि त्यानंतर तो मानवी शरीरात आला असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे. चीनमध्ये वटवाघुळांवर अभ्यास  केल्यावर ही गोष्ट समोर आली होती. मात्र आता धक्कादायक प्रकार म्हणजे भारतातल्या वटवाघुळांमध्येही कोरोना व्हायरस सापडला आहे.

धक्कादायक ! भारतीय वटवाघुळांमध्येही सापडले कोरोना विषाणू...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरस संपूर्ण जगात वाऱ्यासारखा पसरत चालला आहे. हा व्हायरस आधी वटवाघुळांच्या शरीरात होता आणि त्यानंतर तो मानवी शरीरात आला असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे. चीनमध्ये वटवाघुळांवर अभ्यास  केल्यावर ही गोष्ट समोर आली होती. मात्र आता धक्कादायक प्रकार म्हणजे भारतातल्या वटवाघुळांमध्येही कोरोना व्हायरस सापडला आहे.

भारतीय वटवाघुळांच्या २ प्रजातींमध्ये BtCov नावाचा व्हायरस सापडला आहे. हा व्हायरस कोरोना फॅमिलीतला आहे. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनं याबद्दलचा अभ्यास करून हा खुलासा केला आहे.

मोठी बातमी - घरातील जेष्ठांची अत्यंत काळजी घ्या! वाचा, काय माहिती आली समोर?

केरळ, पुद्दुचेरी, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांच्या २५ वटवाघुळांमध्ये BtCov हा व्हायरस सापडला आहे. वटवाघुळांच्या Rousettus आणि Pteropus या प्रजातींमध्ये हा व्हायरस सापडला आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये या संबंधीचा खुलासा करण्यात आला आहे.

दरम्यान ,"वटवाघुळांमध्ये असलेल्या ह्या व्हायरसचा संसर्ग मानवी शरीरात होतो का याबाबतीत अजून कुठल्याही प्रकारचा अभ्यास किंवा संशोधन करण्यात आलेलं नाही", असं पुण्याच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) च्या वैज्ञानिक डॉ. प्रज्ञा डी यादव यांनी म्हंटलंय.    

मन सुन्न करणारी बातमी  - व्हॉट्सऍपवर घेतले अंतिम दर्शन; अंत्यसंस्काराला जाण्याची पोलिसांनी परवानगी नाकारली

डॉक्टर प्रज्ञा यादव यांच्या म्हणण्यानुसार, या वटवाघुळांमध्ये आढळलेल्या व्हायरसचा COVID-19 सोबत कुठलाही संबंध नाही. या आधी वटवाघुळांमध्ये निपाह नावाचा व्हायरसही सापडला होता. वटवाघुळांच्या शरीरात अनेक प्रकारचे व्हायरस असतात. यातले काही व्हायरस मानवी शरीरासाठी घातक असतात मात्र यामुळे वटवाघूळांना काहीही होत नाही.

त्यामुळे वटवाघुळांच्या शरीरातले नक्की कुठले व्हायरस मानवी शरीरासाठी धोकादायक असतात यावर सतत संशोधन करणं आवश्यक आहे  असं इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये  सांगण्यात आलंय.

indian bats also has corona virus says researchers

loading image
go to top