दसरा मेळाव्याचा वाद पेटला! शिंदे गटाच्या अर्जानंतर शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray and Eknath Shinde

दसरा मेळाव्याचा वाद पेटला! शिंदे गटाच्या अर्जानंतर शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई – सध्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात संघर्ष सुरू झाला आहे. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर होतो. मात्र यावेळी शिवसेनेत फूट पडली असून एकनाथ शिंदे यांनी बंड करत आमचीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. तसेच दसरा मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Shivsena News in Marathi)

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाचा मुद्दाम डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रताप सरनाईकांच्या मुलाखतीनंतर स्पष्ट झालं की, ईडीच्या भीतीमुळे हे सर्व तिकडे गेले आहेत. हिंदुत्व वगैरे काही नाही, यांच्या चेहऱ्यावरचा हिंदुत्वाचा मुखवटा निखळून पडला आहे. एकच नेता, एकच विचार, एकच मैदान हे ५० वर्षांपासून गाजत आल्याचं शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी म्हटलं.

तुमच्या शाखेसमोर आमची शाखा, तुमच्या मेळाव्यासमोर आमचा मेळावा हा थिल्लरपणा आणि पोरकटपणा सुरू आहे. कोणाच्या दबावाखाली चालू आहे हे दिसून येत आहे. दिल्लीश्वराकडून त्यांना सूचना मिळत आहेत, हे लक्षात येत आहे. त्या सूचनाप्रमाणे शिंदे गट वागत असल्याचा दावा कायंदे यांनी केला.

हेही वाचा: मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे

आपल्या पक्षाची गद्दारी करून उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र दसरा मेळावा हा शिवसेनेचा पारंपरिक आणि सांस्कृतीक कार्यक्रम आहे. दसरा मेळावा तिथेच होणार असून असली आणि नकली कोण हे लोकांनी ओळखल्याचं कायंदे यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी अर्ज सादर केला आहे. दरवर्षी मीच अर्ज करायचो. आताही मीच अर्ज केला आहे.

Web Title: Dussehra Rally Controversy Shiv Sena Eknath Shinde Manisha Kayande

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..