
Mumbai News : ठाकरेंना धक्का! शिवाजी पार्क मैदानातील धूळ नियंत्रणाचे कंत्राट रद्द
मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या धुळीच्या प्रदुषणामुळे नागरिकांना श्वसानाच्या त्रासांचा सामना करावा लागला होता. मैदानातील धुळीचे प्रदुषण करण्यासाठी याठिकाणी मातीचा भराव घालून हिरवळ तयार करण्यात आली होती.
तसेच हिरवळीच्या देखभालीसाठी तीन वर्षासाठी कंत्राटदाराचीही नेमणूक केली होती. परंतु हे कंत्राट आता महानगरपालिकेकडून रद्द करण्यात आले आहे. रद्द झालेले कंत्राट हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आणखी एक प्रकल्पाला धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
मैदानाची हिरवळ राखण्यासाठी पाणी मारण्यासाठी वर्षाला एक कोटी रूपये खर्च करण्याची आवश्यकता नाही, अशी सबब पालिकेकडून देण्यात आली आहे. त्याठिकाणी कंत्राटी कामगारांची मदत घेऊन मैदानावर पाणी मारत हिरवळ राखण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून विहिरीच्या पाण्याचा वापर हिरवळीवर करण्यात आला आहे. त्यासाठी पर्जन जलवाहिन्याही टाकण्यात आल्या आहेत. धुळीचे संकट कमी व्हावे तसेच संपूर्ण परिसरात हिरवळ आणि माती टिकून रहावी यासाठी संपूर्ण परिसरात तुषार सिंचन प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे.
मैदानातील समस्या तत्काळ सोडवता याव्यात तसेच मैदानातील साफसफाई आणि मेन्टेन्स यासाठी तीन वर्षाचे कंत्राट देण्यात आले होते. परंतु पालिकेने हे तीन वर्षाचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.