esakal | मनसेपुढे ई-कॉमर्स जायंट 'ॲमेझॉन' झुकली, लवकरच अमॅझॉनवर दिसणार मराठी भाषा
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेपुढे ई-कॉमर्स जायंट 'ॲमेझॉन' झुकली, लवकरच अमॅझॉनवर दिसणार मराठी भाषा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'नो मराठी नो ॲमेझॉन' ही मोहीम सुरू करण्यात आली होती.

मनसेपुढे ई-कॉमर्स जायंट 'ॲमेझॉन' झुकली, लवकरच अमॅझॉनवर दिसणार मराठी भाषा

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'नो मराठी नो ॲमेझॉन' ही मोहीम सुरू करण्यात आली होती. आधी रीतसर निवेदन देऊनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाकडे ॲमेझॉनकडून दुर्लक्ष केले गेल्याने मनसे आक्रमक झालेली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ॲमेझॉनला आपल्या विविध आंदोलनांमधून याबाबत आठवण देखील करून दिली होती. दरम्यान, 'नो मराठी नो ॲमेझॉन' या मोहिमेनंतर ॲमेझॉन देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. ॲमेझॉनकडून मनसे कामगार सेनाला आणि थेट राज ठाकरे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. राज ठाकरेंना दिंडोशी न्यायालयाकडून नोटीस आल्यानंतर मनसे नेते आणि कार्यकर्ते अधिकच संतापले.  

महत्त्वाची बातमी : "...तसं होणार नाही" म्हणत एकनाथ खडसेंच्या ED नोटीस प्रकरणावर संजय राऊत संतापलेत

या पार्श्वभूमीवर काल मुंबई, पुणे आणि वसई येथील ॲमेझॉन कार्यालय देखील मनसेने फोडलेलं पाहायला मिळालं. त्यानंतर ॲमेझॉनकडून मनसेला आता मेल प्राप्त झाला आहे. यामध्ये ॲमेझॉन एक पाऊल मागे गेल्याच पाहायला मिळालं. लवकरच आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन आणि वेबसाईटवर  मराठी भाषा दिसणार असल्याचं ॲमेझॉनकडून सांगण्यात आलं आहे. राहुल सुंदरम यांनी अखिल चित्रे याना त्याबाबतचा ई-मेल पाठवला आहे.  

महत्त्वाची बातमी : "मरतुकड्या अवस्थेतील विरोधी पक्ष, हे चित्र बरं नव्हे"; सामनातून संजय राऊतांचे काँग्रेसला चिमटे

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे आज कृष्णकुंजवर गेले असून स्वतः राज ठाकरे देखील ॲमेझॉनच्या संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याची आता समोर माहिती समोर येतेय/. येत्या पाच तारखेला मनसे कामगार सेनेच्या अधिकाऱ्यांना दिंडोशी कोर्टात हजर करण्याची नोटीसही आली आहे. यामध्ये वाटल्यास राज ठाकरे उपस्थित राहू शकतात असं देखील नमूद केलं आहे. मात्र आता ॲमेझॉन याबाबतही सर्व केसेस विड्रॉ करेल असंही चित्रे म्हणालेत.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा   

e commerce giant amazon on back foot after serious agitation by maharashtra navanirman sena

loading image