esakal | "...तसं होणार नाही" म्हणत एकनाथ खडसेंच्या ED नोटीस प्रकरणावर संजय राऊत संतापलेत
sakal

बोलून बातमी शोधा

"...तसं होणार नाही" म्हणत एकनाथ खडसेंच्या ED नोटीस प्रकरणावर संजय राऊत संतापलेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतेच प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून म्हणजेच ED कडून नोटीस आल्याची बातमी समोर येत आहे.

"...तसं होणार नाही" म्हणत एकनाथ खडसेंच्या ED नोटीस प्रकरणावर संजय राऊत संतापलेत

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतेच प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून म्हणजेच ED कडून नोटीस आल्याची बातमी समोर येत आहे. अशात स्वतः एकनाथ खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजून आपल्याला नोटीस प्राप्त झालेली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्यातील भोसरी मधील जमीन व्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय. याबाबत आज जळगावात स्वतः एकनाथ खडसे बोलण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासोबत इतरही काहींची चौकशी केली जाणार असल्याचं बोललं जातंय. 

महत्त्वाची बातमी: अजूनही FASTag काढलेला नाही ? जाणून घ्या कसा मिळवाल फास्टॅग

यावर संजय राऊत म्हणतात... 

याबाबात मुंबईत शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणालेत की, "जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. म्हणूनच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे", असं संजय राऊत म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी: एकनाथ खडसेंना आली ED ची नोटीस ? यावर खडसेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी भाषण केलेलं. यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुम्ही राष्ट्रवादीत आलात तर तुमच्यामागे ED लावतील असं मला विचारल्याचे खडसे म्हंटले होते. यावर ED लावली तर मी CD लावीन असं एकनाथ खडसे म्हणाले होते.आता याबाबत एकनाथ खडसे काय पावले उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 sanjay raut on eknath khadase and ED notice case mahavikas aaghadi politics and bjp

loading image