मुंबई पालिकेतल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच पुस्तकाची पर्वणी, ई-ग्रंथालय सुरु होणार

समीर सुर्वे
Sunday, 14 February 2021

मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये ई ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहे. यात पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय सुरु करण्यात येणारेय.

मुंबई: मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये ई ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहे. यात पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहे. यासाठी महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे.

महानगर पालिकेने 25 शाळांमध्ये टिकरींग अटल प्रयोग शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्थायी समितीचीही परवानगी मिळाली आहे. आता शिक्षणात अधिकाअधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ई -ग्रथांलय सुरु करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 25 प्रयोग शाळांमध्ये हे ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे ग्रंथालय सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या ग्रंथसंग्रहालयात मार्फत विद्यार्थ्यांना अवंतर वाचनातून विषयाचे संदर्भ कळू शकतील अशा प्रकारची पुस्तक वापरण्यात येणार आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नक्की काय असेल

पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी,उर्दु इंग्रजी भाषेतील पुस्तक संगणकाता पीडीएफ स्वरुपात असतील. यात संदर्भ पुस्तके, शब्दकोश, व्याकरण, निबंध, सामान्य ज्ञान, विज्ञान, गणित अशा विषयांची पुस्तकं प्रामुख्याने असतील, असे आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात नमुद केले आहे.

हेही वाचा- मुंबईत कोरोनाचा प्रार्दुभाव आटोक्यात? शनिवारी दिवसभरात आढळले ५०० हून अधिक रुग्ण

 नागरिकांसाठीही ई-ग्रंथालय

महानगर पालिका मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयालाही अनुदान देते. या ग्रंथसंग्रहालयातही अशा प्रकारे ई ग्रंथालयाची सोय उपलब्ध करुन देण्याचा मानस आयुक्त चहल यांनी व्यक्त केला आहे. त्याच बरोबर एशियाटीक सोसायटीलाही महानगर पालिकेकडून अनुदान देण्यात येते. यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

E Library will be started Mumbai bombay Municipal Corporation schools


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E Library will be started Mumbai bombay Municipal Corporation schools