'ई-सकाळ'च्या 'ट्विट'ची रेल्वे प्रशासनाकडून दखल

योगेश महाजन ः सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस दलाला कार्यवाहीचे आदेश

अमळनेर : रेल्वेच्या मुंबई विभागातील ताप्‍ती सेक्शनवरल सुरत- भुसावळ लोहमार्गावर लुटीचे प्रमाण वाढले आहे. नुकतीच ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये सशस्त्र गुंडांनी प्रवाशांची लूट केली. या पार्श्वभूमीवर आज 'ई सकाळ'ने आज वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त सकाळच्या ट्टिटरवर शेअर होताच मुंबई पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने तत्काळ दखल घेतली असून, रेल्वे पोलीस दलाला सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले.

केमोथेरपी करायची आहे? आता चिंता करण्याची गरज नाही. वाचा संपुर्ण प्रकरण

सुरत- भुसावळ लोहमार्गावर रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, ताप्ती गंगा एक्सप्रेसमधील प्रवाशांच्या लुटीमुळे सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याबाबत सकाळने आवाज उठविला असून, आज 'ई सकाळ'ने 'सुरत- भुसावळ रेल्वेने प्रवास करतात.. मग सावधान रहा' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. ही बातमी सोशल मिडियावर व्हायरलही झाली.

हेही वाचा - शिक्षक संपावर विद्यार्थी वर्गावर

सकाळच्या ट्विटरवर शेअर होताच मुंबई पश्‍चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखलही घेतली असून, रेल्वे पोलीस दलाला (आरपीएफ) कारवाईचे आदेश दिले आहेत. या कारवाईने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळल्या असून, प्रवाशांची लूट करणाऱ्या काही गुंडांवर गुन्हा दाखल झाला. सुरत- भुसावळ मार्गावर रेल्वे पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 'ई सकाळ'च्या बातमीने प्रवाशांना न्याय मिळाल्याने 'सकाळ'चे कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: E-Sakal's 'tweet' reply from the railway administration