
मुंबई : एसटीचा आधुनिक चेहरा अशी ओळख असलेल्या ई-शिवनेरीच्या सेवेला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत मुंबई-ठाणे-पुणे मार्गावर प्रवाशांनी या गाडीतून प्रवास केला आहे. ई-शिवनेरीमुळे महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटींची भर पडली असल्याने उदंड प्रतिसादात ई-शिवनेरीची घोडदौड दोन वर्षानंतरही कायम आहे अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.