मुंबईसह पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराट

पूजा विचारे
Saturday, 5 September 2020

उत्तर मुंबईत पहाटेच्या सुमारास २.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवल्याचं समजतंय.  सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत.  पालघरनंतर आता मुंबई आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसले.

मुंबईः उत्तर मुंबईत पहाटेच्या सुमारास २.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवल्याचं समजतंय.  सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत.  पालघरनंतर आता मुंबई आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे  नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पालघरमधील बोर्डी झाई परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एकापाठोपाठ एक दोन भूकंपाचे धक्के जाणवले. 

पहिला भूकंपाचा धक्का ११ वाजून ४२ सेकंदच्या दरम्यान बसला. २८ मिनिटाच्या अंतराने १२ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचा दुसरा मोठा धक्का बसला. या धक्क्याची तीव्रता जबरदस्त असल्यामुळे मध्यरात्री नागरिक घाबरुन होऊन जागे झाले आणि घराबाहेर आले. 

 

अधिक वाचाः  विद्यार्थ्यांनो ही खास बातमी तुमच्यासाठी, स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक जाणून घ्या

मुंबईत 24 तासांत दोन वेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर मुंबईमध्ये शनिवारी सकाळी 6.36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यात येणाऱ्या भूकंपानंतर आता मुंबईतही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. दुसरीकडे भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं आहे.

 

हेही वाचाः  मुंबईत उन्ह्याच्या झळा; तापमान 34 अंशाजवळ, जाणून घ्या येत्या दोन दिवसात कसं असेल तापमान

याआधी गेल्या महिन्यात पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पालघरमध्ये झालेल्या या सौम्य भूकंपामुळे कोणतंही नुकसान झालं नाही. पालघर जिल्ह्यात 2.8 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाली नव्हती.

Earthquake magnitude 2.7 occurred 98 km north of Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake magnitude 2.7 occurred 98 km north of Mumbai