मुंबईत उन्ह्याच्या झळा; तापमान 34 अंशाजवळ, जाणून घ्या येत्या दोन दिवसात कसं असेल तापमान

समीर सुर्वे
Saturday, 5 September 2020

पावसाळी ढग नसल्याने शुक्रवारी दिवसभर उन्हाचे चटके जाणवत होते. सांताक्रुझ मध्ये शुक्रवारी कमाल तापमान 33.8 अंश तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

मुंबई: पावसाळी ढग नसल्याने शुक्रवारी दिवसभर उन्हाचे चटके जाणवत होते. सांताक्रुझ मध्ये शुक्रवारी कमाल तापमान 33.8 अंश तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर आज आणि उद्या म्हणजे येत्या दोन दिवसात तापमान याच पातळीवर राहाणार आहे. तर  मंगळवारपर्यंत हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. शुक्रवारीही मुंबईत पाऊस झाला नसल्याने उन्हाचा दाह वाढला आहे. सप्टेंबर महिन्यापासून सांताक्रुझ येथील तापमानात 3 अंशा पेक्षा जास्त तापमानाची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1 अंशा पेक्षा जास्त वाढ झाली आहे. शुक्रवारी कमाल 32.6 आणि किमान 26 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचाः  कारशेड अभावी मेट्रो-३ प्रकल्प तीन वर्ष लांबणार?, खर्चात २ ते ३ हजार कोटींची होणार वाढ

मुंबईत मंगळवार पर्यंत हलक्या सरी पडणार आहेत. पुढील दोन दिवस रात्रीच्यावेळी मेघगर्जनेसह हलक्या सरींचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे.

अधिक वाचाः  विद्यार्थ्यांनो ही खास बातमी तुमच्यासाठी, स्पेशल ट्रेनचं वेळापत्रक जाणून घ्या

येत्या दिवसात असा असेल पाऊस 

  • ५ सप्टेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

  • ६ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
  • ७ ते ८ सप्टेंबर या दिवशी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

(संपादनः पूजा विचारे)

Temperature rises in Mumbai near 34 degrees


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temperature rises in Mumbai near 34 degrees