अवघ्या ५ मिनिटात घरच्याघरी 'असं' बनवा हॅन्ड सॅनिटायझर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

मुंबई: जगभरात कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. भारतात आता कोरोना व्हायरसचे अनेक रुग्ण सापडले आहेत. पुण्यात देखील कॉरोनच्या पाच पॉझिटिव्ह केसे आहेत. दरम्यान वेळोवेळी प्रशासनाकडून आणि तज्ज्ञांकडून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ रुमाल तोंडाला बांधणे, आपले हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापर करणे असे काही उपाय सांगण्यात येत आहेत. 

मुंबई: जगभरात कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. भारतात आता कोरोना व्हायरसचे अनेक रुग्ण सापडले आहेत. पुण्यात देखील कॉरोनच्या पाच पॉझिटिव्ह केसे आहेत. दरम्यान वेळोवेळी प्रशासनाकडून आणि तज्ज्ञांकडून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ रुमाल तोंडाला बांधणे, आपले हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापर करणे असे काही उपाय सांगण्यात येत आहेत. 

मोठा खुलासा : उद्धव ठाकरेंबद्दल राजकीय हवा चटकन ओळखणारे रामदास आठवले म्हणतात...

यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले हात स्वच्छ ठेवणे आहे. अशात कुठेही बाहेर गेल्यावर हँड सॅनिटायझरचा उपयोग करा असं आवाहन केलं जात आहे. मात्र बाजारात विकलं जाणारं हॅन्ड सॅनिटायझर अतिशय महाग आहे. सर्वसामान्य लोकांना हे परवडणारं नाहीये. तसंच बाजारातल्या सॅनिटायझरमध्ये रासायनिक पदार्थ असतात ज्यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते.

मात्र आता चिंता करू नका, आम्ही तुम्हाला घरच्या घरी हॅन्ड सॅनिटायझर कसं तयार करायचं हे सांगणार आहोत. त्यामुळे तुमच्या घरच्या काही गोष्टींचा उपयोग करून तुम्ही हॅन्ड सॅनिटायझर बनवू शकणार आहात. 

या गोष्टी आहेत महत्वाच्या :

  • ऍलोव्हेरा जेल
  • गुलाब पाणी 
  • टी ट्री ऑईल -- ५ थेंब 
  • लॅव्हेंडर ऑईल -- ६-७ थेंब 
  • स्क्वीझ बॉटल 

मोठी बातमी - जोतिरादित्य शिंदेंच्या राजीनामन्यानंतर मुंबईतील 'हा' मोठा नेता देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी ?

असं तयार करा  हॅन्ड सॅनेटाईझर:

एका स्क्वीझ बाटलीत ऍलोव्हेरा जेल घ्या. यामध्ये शुद्ध गुलाब पाणी टाका. यानंतर या मिश्रणात ५ थेंब टी ट्री ऑईल टाका. यामुळे विषाणू किंवा ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो ते तुमच्यापासून दूर राहतील. त्यानंतर या मिश्रणात ६-७ थेंब लॅव्हेंडर ऑईल टाका. त्यानंतर बॉटल बंद करा आणि चांगल्या पद्धतीनं मिश्रणाला मिसळून घ्या.

अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हॅन्ड सॅनिटायझर तयार करू शकता. विशेष म्हणजे हे घरगुती सॅनेटाईझर तुही अवघ्या ५ मिनिटात बनवू शकणार आहात. यामुळे तुमचे हात सॉफ्ट राहणारच आहेत त्यासोबत तुमच्या हातावरील विषाणू मारण्यासदेखील मदत होईल. 

easy trick to make home made hand sanitizer in less than 5 minutes


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: easy trick to make home made hand sanitizer in less than 5 minutes