जोतिरादित्य शिंदेंच्या राजीनामन्यानंतर मुंबईतील 'हा' मोठा नेता देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी ?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

मुंबई - मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्यप्रदेशातील राजकारणात मोठा भूकंप आलाय. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला मोठा शॉक बसलाय. गेल्या अनेक दिवसांपासून जोतिरादित्य शिंदे नाराज होते असं बोललं जातंय. काँग्रेसने आपल्याला डावललं आणि काम करू दिलं नाही अशी देखील माहिती समोर येतेय. जोतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आलंय.

मोठी बातमी - "एकही महत्त्वाचं खातं नसलेले पाहिले मुख्यमंत्री सध्या शॅडो म्हणूनच काम करतायत" 

जोतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर त्याचे प्रतिसाद मुंबईत उमटणार का ? असा प्रश्न उपस्थित होतोय. याला कारण म्हणजे मुंबईतील एक मोठा काँग्रेस नेता पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. या बड्या नेत्याचं नाव आहे मिलिंद देवरा. मिलिंद देवरा तसे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. अशात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्रात राजकीय गणितं बदलली आहेत आणि त्यामुळेच मिलिंद देवरा नाराज असल्याचं बोललं जातंय. 

मोठी बातमी -  जरासं दुर्लक्ष आणि चार वर्षांचा आरिफ आई वडिलांना सोडून गेला...

मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं होतं. स्वतः मोदींनी यावर रिप्लाय देखील केला होता. लोकसभेतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र गेलीत. काँग्रेसच्या काही जुन्या नेत्यांमुळे काँग्रेस पक्षाची अवस्था खराब झाली असं राहुल गांधी यांचं मत होतं, मात्र जुने नेते पद सोडायला तयार नव्हते, असं देखील बोललं जातं.  

after resignation of jyotiraditya scindia this leader is on the verge of quitting congress

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after resignation of jyotiraditya scindia this leader is on the verge of quitting congress