ED Action: मुंबईत ईडीची मोठी कारवाई! रंगशारदा हॉटेलसह ३३२ कोटींच्या मालमत्ता जप्त, भूखंडाचाही समावेश

ED Action In Mumbai : मुंबईत ईडीने मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत रंगशारदा हॉटेलसह ३३२ कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
ED Action In Mumbai

ED Action In Mumbai

ESakal

Updated on

मुंबई : मनी लॉटिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रभुदास विरचंद लोटिया आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या प्रकरणात सुमारे ३३२.२४ कोटी किमतीच्या दोन स्थावर मालमत्ता जप्त केल्या. यामध्ये वांद्रे येथील हॉटेल रंगशारदा आणि प्रभादेवी येथील भूखंडाचा समावेश असून या दोन्ही मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रा. लि. च्या ताब्यात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com