esakal | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय योगेश देशमुख यांना ईडीकडून अटक
sakal

बोलून बातमी शोधा

ed.jpg

योगेश देशमुख यांची अटक ही प्रताप सरनाईक यांच्यासाठी एक धक्का मानला जात आहे. 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय योगेश देशमुख यांना ईडीकडून अटक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: सक्तवसुली संचालनालयाने व्यावसायिक योगेश देशमुख यांना अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक झाली आहे. योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. योगेश देशमुख यांची अटक ही प्रताप सरनाईक यांच्यासाठी एक धक्का मानला जात आहे. 

१७ मार्चला योगेश देशमुख यांच्या घरावर ईडीने छापा मारला होता यापूर्वी ईडीने प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चंदेल यांनाही अटक केली होती. घरावर छापेमारीची कारवाई केल्यानंतर योगेश देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. 

शिवसेनेला धक्का! माजी आमदार तृप्ती सावंत यांचा भाजपात प्रवेश

त्याआधी २४ नोव्हेंबरला ईडीने प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्यावर घरावर आणि कार्यालयावर छापेमारीची कारवाई केली होती. घर-कार्यालयावर छापेमारीची कारवाई झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना आपण कुठलही गैरकृत्य केलेलं नाही. त्यामुळे आपण चिंता करत नाही असं म्हटलं होतं. 

loading image