'मुंबईमध्ये EDला मिळेना ऑफिससाठी जागा'; वर्षभरापासून शोध सुरू

'मुंबईमध्ये EDला मिळेना ऑफिससाठी जागा'; वर्षभरापासून शोध सुरू

मुंबई - आर्थिक व्यवहारांची चौकशीतून धनदांडग्यांना घाम फोडणारे अंमलबजावणी संचलनालय (ईडी) गेल्या वर्षभरापासून मुंबईत कार्यलयाच्या शोधात आहेत. परंतु ईडीच्या अटी व शर्थीतील ऑफिस शोधूनही सापडत नसल्याची स्थिती आहे. ईडीची ही शोध मोहिम अद्यापही सुरूच आहे.

मुंबईतील स्वतःच्या कार्यालयीन जागेसाठी अंमलबाजवणी संचलनालयची (ईडीची )च्या ऑफिसची शोधाशोध सुरू आहे. ईडीच्या अटीशर्थींचा विचार करता अशा आवाढव्य कार्यालयाची ईडीला गरज आहे. जवळपास 30 हजार स्केअर फूटापेक्षा अधिक जागेच कार्यालयासाठी गरज आहे. या ऑफिसला जोड म्हणजे पार्किंगची जागा आणि पुरेसा वीज, पाणी पुरवठा यासारख्या अटी ईडी प्रशासनाने ठेवल्या आहेत. ईडी ऑफिससाठी जागा शोधत आहे, याबाबतची एक नोटीस काढत मुंबईत जागा हवी आहे असे इडीने यामध्ये म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे ईडी प्रशासनाला ऑफिससाठी हवी असलेली जागा ही बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, कुलाबा, नरिमन पॉईंट यासारख्या जागेतच हवी आहे.

ईडीच्या कार्यालयाचा वापर वाणिज्यिक तत्वावर होणार आहे. या संपुर्ण प्रक्रियेसाठी एक निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यामध्ये तांत्रिक आणि बोली प्रक्रियेच्या टप्प्यानंतरच ही निविदा प्रक्रिया पुर्ण करण्यात येईल असे ईडीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

ED doesnt get office space in Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com