esakal | मुंबई : ED चे सहसंचालक सत्यब्रत कुमार यांची बदली; हाताळली अनेक हायप्रोफाईल प्रकरणं
sakal

बोलून बातमी शोधा

satyabrat kumar

मुंबई : ED चे सहसंचालक सत्यब्रत कुमार यांची बदली

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई (mumbai) अंमलबजावणी (ED) संचालनालयासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. देशात अनेक हायप्रोफाईल प्रकरणे आहेत, ज्यांची मुंबई युनिट चौकशी करत आहे, या युनिटचे संयुक्त संचालक सत्यब्रत कुमार (Satyabrat Kumar) यांची बदली करण्यात आली आहे. सत्यब्रत कुमार 7 वर्षांहून अधिक काळ मुंबई ईडीमध्ये होते.

त्यांच्या जागी कोण येणार?

सूत्रांनी सांगितले की त्यांची 7 वर्षे यापूर्वीच संपली होती, त्यांनी त्यांच्या मुदतवाढीसाठी विनंती केली होती. मात्र त्यांना मुदत वाढ देण्यात आलेली नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या आदेशानुसार, त्याच्याकडे असलेले सर्व खटले सत्यब्रतांकडून काढण्यात आले आहेत. आता फक्त कोळसा घोटाळ्याशी संबधित प्रकरण त्यांच्याकडे ठेवण्यात आलेली आहेत. आता त्यांच्या जागी कोण येणार हे पाहावे लागेल.

हेही वाचा: 'मोदी जगाची शेवटची आशा', आम्ही छापलं नाही - न्यूयॉर्क टाइम्स

हेही वाचा: '७ वर्षांत जातीचा आकडा ४६३५ वरून ५ लाखांवर, ही तर RSS ची थापेबाजी'

loading image
go to top