Palghar District School
sakal
विरार - पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता ९ वी ते १० वीचे वर्ग बंद करण्याच्या निर्णयाविरोधात श्रमजीवी संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे दुर्गम भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली असून, याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा एकमुखी ठराव श्रमजीवी संघटनेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.