esakal | संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ED समोर राहणार हजर ?
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ED समोर राहणार हजर ?

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस बजावण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ED समोर राहणार हजर ?

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस बजावण्यात आली आहे. आज ED ने वर्षा यांना मुंबईतील ED कार्यालयात चौकशीसाठी पाचारण केलं आहे. दरम्यान वर्षा राऊत या आज चौकशीसाठी उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शिवसेनेकडून वर्षा राऊत यांच्या ED चौकशीबाबत जाण्याचा कोणताही निर्णय आलेला नाही. 

महत्त्वाची बातमी : मुंबई, ठाणे, नवी मुंबई गारठली ! मुंबईचा पारा 13 अंश सेल्सिअसवर, तापमानात आणखीन घट होण्याची शक्यता

ईडीच्या आडून कुटुंबांवर हल्ले करणं ही नामर्दानगी :

'ईडीच्या आडून कुटुंबांवर हल्ले करणं ही नामर्दानगी आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन लढा,' असं थेट आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलंय. तुम्ही कुणाशी पंगा घेतलाय हे लवकरच कळेल, तुमची नशा उतरवून टाकेन, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावलाय. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावलीय. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. वर्षा राऊत यांनी दहा वर्षांपुर्वी 50 लाखांचं कर्ज घेतलं असून त्याची पूर्ण माहिती आपण आयकर विभागाला दिलेली आहे. असं असतानाही ईडीच्या नोटीशीचा संबंध काय असा सवालही त्यांनी केलाय. शिवाय 'भाजप नेत्यांची संपत्ती 1600 पटींनी वाढली' त्या नेत्यांची चौकशी करणार का? असा सवालही त्यांनी केलाय.

याही बातम्या वाचा : 

>> पश्चिम रेल्वेप्रमाणेच IRCTC,MRVCकडून मराठी भाषेची गळचेपी

>> हृदयामुळे कित्येक वर्ष बसून झोपणाऱ्या 36 वर्षीय नायजेरीयन तरुणाला जीवदान

>> Corona Effect: कोविड 19 चा दुष्परिणाम, त्वचा दानात 90 टक्क्यांनी घट

>> New Year 2021: न्यू इअर पार्टीचे प्लानिंग करताय, मग ही काळजी घ्या ! 

भाजप प्रदेश कार्यालय असा बॅनर

भाजप ईडीच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप राऊतांनी करताच आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मुंबईतील ED कार्यालयासमोर भाजप प्रदेश कार्यालय असा बॅनर लावला. संजय राऊतांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली. शिवसेना नेत्यांना वारंवार ईडीकडून नोटीस येत असल्याने भाजप आणि ईडीचं साटंलोटं असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ED enquiry of varsha raut wife of sanjay raut maharashtra shivsena politics bjp

loading image