Education Department Rules for School
ESakal
मुंबई
School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली
Education Department: शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अॅक्शन मोड जारी केला आहे. शारीरिक शिक्षा, मानसिक छळ यानंतर आता शिक्षकांकडून बनवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रीलबाबतही विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
पनवेल : काही शिक्षक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या रील तयार करून सोशल मीडियावर अपलोड करतात, पण, आता त्यांना यासाठी पालक किंवा सक्षम प्राधिकरणांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा, मानसिक छळ, शाब्दिक अपमान किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव केल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई होणार आहे.

