esakal | गुड न्यूज: सहा हजार शिक्षकांची रिक्त पदे भरणार; वर्षा गायकवाड यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

varsha gaikwad

सहा हजार शिक्षकांची रिक्त पदे भरणार; वर्षा गायकवाड यांची माहिती

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : मागील अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित आदी शाळांचे रिक्त (School Vacancies) असलेली विविध विष्यानाची सुमारे 6 हजाराहून अधिक शिक्षकांची पदे (Teacher Post) लवकरच भरली जाणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करून नवीन शिक्षकांना (New Teacher selection) निवड करताना त्यांच्या गुणवत्तेचा विचार प्रामुख्याने केला जाणार आहे, आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता (Positivity in vacancies) आणण्यासाठी ही सर्व प्रक्रिया पवित्र प्रणालीच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ( Education minister Varsha Gaikwad says six thousand Teacher vacant post will not be empty)

शिक्षकांची ही भरती प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या,खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) असलेल्या रिक्त पदांवर केली जाणार आहे. यासाठी उमेदवाराची “अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी" परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी"परीक्षेत उच्चतम गुण मिळवणा-या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

हेही वाचा: CKP बँकेतील भागधारकांच्या हक्कासाठी संघर्ष समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव

डिसेंबर, 2017 मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी" परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे 12 हजार 70 शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 5 हजार 970 शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी,2020 मध्ये पूर्ण झाली आहे. मात्र, पुरणाच्या पार्श्वभूमीवर नवीन भरती करण्यास बंदी असल्याने त्यासाठी ती कारवाई थांबली होती अशी माहिती देण्यात आली.

loading image