एपीएमसी मार्केटमध्ये इजिप्तचा कांदा दाखल, जुना कांदा संपण्याच्या मार्गावर; आवक घटल्याने भाववाढीची शक्यता

APMC Market Egyptian Onions : एपीएमसी मार्केटमध्ये इजिप्तचा कांदा दाखल झाला आहे. यामुळे जुना कांदा संपण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
APMC market Egyptian onions

APMC market Egyptian onions

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : राज्यात साठवलेला जुना कांदा आता संपण्याच्या मार्गावर असून, सततच्या पावसामुळे साठवणुकीतील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाशीतील एपीएमसी मार्केटमधील एका व्यापाऱ्याने इजिप्तमधून दोन कंटेनर कांदा आयात केला आहे. सुमारे ५० टन कांदा आज बाजारात दाखल झाला. कांद्याची आवक घटली असून, दैनंदिन मागणी मोठी असल्याने आगामी काळात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com