नवी मुंबईतील 'या' परिसरात अजगर, सापांमुळे नागरिक हैराण!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील मलनिस्सारण केंद्रामध्ये मंगळवारी (ता.१४) मोठा आठ फुटांचा अजगर आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ येथील मलनिस्सारण केंद्रामध्ये मंगळवारी (ता.१४) मोठा आठ फुटांचा अजगर आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत तत्काळ सर्पमित्रांना माहिती देण्यात आली. सर्पमित्र आल्यानंतर त्यांनी अजगराला पकडून जंगलात सोडले. हा अजगर नैसर्गिक निवास सोडून रहिवासी भागात आला असावा, असा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला.

ही बातमी वाचली का? मुंबई ते ठाणे प्रवास अधिक वेगवान!

पालिका कर्मचारी सचिन पाटील व श्‍याम मेहेर हे कार्यावर होते. त्यांना पाण्याचा टाकीच्या बाजूला भलामोठा अजगर आढळला. सचिन पाटील यांनी ताबडतोब सर्पमित्र दीपक गायकवाड यांना कळविले असता गायकवाड, कलमेश मनगुटकर यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांनी  आठ फूट लांबीच्या अजगराला मोठ्या शिताफीने पकडल्यानंतर जंगलात सोडून जीवदान दिले. या अगोदर याच ठिकाणी सात-आठ महिन्यांच्या कालावधीत चार अजगर, दोन, धामण, घोणस, एक कोब्रा आढळून आला आहे. गायकवाड यांनी त्यांना पुन्हा जंगलात सोडून जीवदान दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An eight-foot Pythons in Nerul snakes navi mumbai

टॅग्स
टॉपिकस