
उल्हासनगर : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या उल्हासनगरातील शासकीय मुलींच्या निरीक्षण गृहातून पळून गेलेल्या 8 अल्पवयीन मुलींपैकी 7 मुली रेल्वे स्थानकातून शोधून काढण्याची शोधमोहीम हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या टीमने राबवली आहे.मात्र एक मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाली आहे.