esakal | आकडा वाढला - सकाळी ८९ तर संध्याकाळी ९७, महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी ८ नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

आकडा वाढला - सकाळी ८९ तर संध्याकाळी ९७, महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी ८ नवे रुग्ण

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन घोषित केलंय. लॉकडाऊन अंतर्गत महाराष्ट्रात अत्यावश्यक करणांशिवाय घराबाहेर पडतात येणार नाहीये. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या माहिती प्रमाणे जिल्ह्यांमधील बॉर्डर्स देखील सील करण्यात आल्यात. 

आकडा वाढला - सकाळी ८९ तर संध्याकाळी ९७, महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी ८ नवे रुग्ण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी सर्व स्तरातून प्रयन्त केले जातायत. अशात दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. आज सकाळी जो आकडा आपल्या समोर आला तो चिंता वाढवणारा होता. सकाळी आलेल्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८९ होती.

साम टीव्हीच्या बातमीप्रमाणे २३ मार्च रोजी संध्याकाळी जो आकडा आता समोर येतोय तो आणखी धक्कादायक आहे. महाराष्ट्रात आणखी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झालीये. यामध्ये मुंबईत आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह, साताऱ्यात १ आणि सांगलीत ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा देशात सर्वाधिक म्हणजेच ९७ वर गेलाय. संध्याकाळी आलेल्या या बातमीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. 

मोठी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली 'ही' मोठी गुड न्यूज...

महाराष्ट्र टोटल लॉकडाऊन : 

देशातील कोरोना वाढता संसर्ग पाहता केंद्र आणि राज्य सरकार कडून मोठी पावलं उचलली गेली आहेत. अशात देशात येणारी सर्व विमान सेवा बंद करण्यात आली आहे. देशांतर्गत देखील विमान सेवा बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन घोषित केलंय. लॉकडाऊन अंतर्गत महाराष्ट्रात अत्यावश्यक करणांशिवाय घराबाहेर पडतात येणार नाहीये. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या माहिती प्रमाणे जिल्ह्यांमधील बॉर्डर्स देखील सील करण्यात आल्यात.    

eight new corona positive cases detected in maharashtra maharashtra covid19 count on 97   

loading image