

From Slave to Scientist: The Timeless Appeal of George Washington Carver in Marathi
Sakal
विरार : अमेरिकेत कृष्णवर्णीय गुलाम म्हणून जन्मलेले शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, शिक्षणासाठी केलेली धडपड, निसर्गाची असणारी ओढ आणि त्याच ओढीतून कृषिक्षेत्रात त्यांनी घडवलेली क्रांती हा प्रवास वाचकांपर्यंत पोहोचवणारे आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगायला शिकवणारे पुस्तक म्हणजे एक होता कार्व्हर. ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर लिखित आणि राजहंस प्रकाशन प्रकाशित या पुस्तकाची पन्नासावी आवृत्ती शनिवारी ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर यांच्या निवासस्थानी प्रकाशित करण्यात आली. यावेळी या छोटेखानी प्रकाशन सोहळ्याला राजहंस प्रकाशनचे संचालक व संपादक दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशनचे संपादक सदानंद बोरसे, ज्येष्ठ कलादिग्दर्शक विकास गायतोंडे, वीणा गवाणकर यांचे पती चंद्रकांत गवाणकर आदी मान्यवर उपस्थित होते.