काल मुंबईत दाखल झालेले एकनाथ खडसे आज शरद पवारांना भेटणार?

पूजा विचारे
Wednesday, 7 October 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मुंबईत भेट होणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे हे मुंबईत दाखल झालेत.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मुंबईत भेट होणार असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे हे मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे एकनाथ खडसे आज शरद पवारांना भेटतील अशी चर्चा सुरु झाली आहे. असं म्हटलं जात आहे की,  पवारांना भेटण्यासाठी खडसे कालच मुंबईत आले आहेत. त्यामुळे आज खडसे आणि पवार यांची भेट होईल का याकडे सर्वांतं लक्ष लागलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान एकनाथ खडसे आज शरद पवारांना भेटतील आणि त्यानंतर राष्ट्रवादीत जाण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेतील, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे शरद पवार आपल्या दैनंदिन कामकाजासाठी  वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेत. तर एकनाथ खडसे आपल्या चर्चगेट येथील घरी आहेत. 

अधिक वाचाः  सायबर अटॅकमुळे आयडॉलच्या परीक्षेचा गोंधळ, पेपर पुढे ढकलले

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीत खडसेंना स्थान नाही 

काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. यात महाराष्ट्र राज्यातून पंकजा मुंडे, विनोद तावडे या नेत्यांचा समावेश करण्यात आला. मात्र यातून खडसेंना वगळण्यात आलं.

Eknath Khadse is likely to meet Sharad Pawar in Mumbai today


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Khadse is likely to meet Sharad Pawar in Mumbai today