भाजपमध्ये केलं, तेवढ्याच निष्ठने राष्ट्रवादीचं काम करेल; काय म्हणाले एकनाथ खडसे?

टीम ई-सकाळ
Friday, 23 October 2020

भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश का करत आहे, याचाही खुलासा एकनाथ खडेस यांनी भाषणात केला.

मुंबई : भाजपचे खान्देशातील नेते एकनाथ खडसे यांनी आज, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी अत्यंत खुमासदार शैलीत आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश का करत आहे,  याचाही खुलासा त्यांनी या भाषणात केला.

आणखी वाचा - एका कारणाने एकनाथ खडसे यांना गमववावं लागलं मुख्यमंत्रीपद

एकनाथ खडसे म्हणतात...

 • जेवढ्या निष्ठेने भाजपमध्ये काम केलं, तेवढ्याच निष्ठने राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करेन
 • महिलेला समोर ठेवून मी कधीही राजकारण केलं नाही
 • तुम्ही फक्त माझ्या पाठिशी उभे राहा, मी बदल करून दाखवेन
 • मी कोणत्याही अपेक्षेनं राष्ट्रवादीत आलो नाही; मला घरीच बसावं लागलं असतं 
 • माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला
 • जळगावमध्ये नाथाभाऊंची ताकद दाखवून देईन
 • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश ही कार्यकर्त्यांची इच्छा होती 
 • दिल्लीतल्या ज्येष्ठांनीच सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जा
 • तुम्ही माझ्या मागे ईडी लावली तर, मी सीडी लावेन 
 • डोक्यावरचं ओझं आता हलकं झाल्यासारखं वाटतंय
 • ४० वर्ष काम करून मला काय मिळालं? भाजपमध्ये मला अडगळीत टाकलं
 • संघर्ष करणं माझा स्वभाव, गोड बोलून धोका देणं मला जमत नाही
 • एकेकाळी राष्ट्रवादीवर टीका केली, त्यावेळी विरोधीपक्ष नेता म्हणून माझं काम केलं 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eknath khadse statement while joining ncp