Eknath Shinde : मंत्र्यांनी व आमदारांनी विचार करून बोलावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षाच्या नेत्यांना सल्ला
Maharashtra Politics : शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना कमी बोलण्याचा, जास्त काम करण्याचा सल्ला दिला.
मुंबई : आपण कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढे चांगले. विरोधकांना उघड पाडताना स्वतः उघड होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढे मोठे यश मिळवले ते चुकीचे बोलून घालवू नका.