
मुंबईतील वरळी कोळीवाडा नारळी पोर्णिमेच्या उत्साहात रंगला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे हे एकाच वेळी येथे दाखल झाले. कोळी बांधवांकडून दोन्ही नेत्यांचे उत्साहात स्वागत झाले. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.