
मुंबई : रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या मुंबईकरांना मुंबईबाहेर घर शोधावे लागत आहे. असे रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.