Eknath Shinde : दिल्लीत लोटांगण घालायला नाही तर विकास कामांसाठी जातो; शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde : दिल्लीत लोटांगण घालायला नाही तर विकास कामांसाठी जातो; शिंदेंचा ठाकरेंना टोला

Loksabha 2024 : अहंकारी लोक आपल्या इगोसाठी राज्याचे नुकसान करताना आपण पाहिले आहे. शेवटी सहकार्य योगदान मागायचं असतं. केंद्राकडून मदत मागणं किंवा राज ठाकरे यांच्याकडून सहकार्य मागणे याच्यामध्ये काय लाज वाटली पाहिजे ? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

आम्ही केंद्रात, दिल्लीत लोटांगण घालायला जात नाही तर राज्याच्या विकासासाठी आवश्यक काम करायला जातो असे म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रिक करतील यात शंका नाही असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. शिंदे असतील हे पुन्हा एकदा डोंबिवलीत आयोजित कार्यक्रमात अधोरेखित केले. (eknath shinde latest SPEECH)

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा असलेल्या ' विकासदशक - दहा वर्ष प्रगतीची, कल्याणच्या समृद्धीची ' या कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीत पार पडला. यावेळी खासदार डॉ. शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, प्रमोद हिंदुराव, जगन्नाथ शिंदे यांसह स्थानिक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (Partners of eknath shinde in maharashtra)

याप्रसंगी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील उपस्थित होत्या. मान्यवरांच्या रांगेत त्यांना बसविण्यात आले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला, श्रीकांत डॉक्टर आहे, मी डॉक्टर नसलो तरी मी काही सर्जरी केल्या आहेत. काही लोकांचे पट्टे गायब झाले पटापट, काही लोक फास्ट चालायला लागले ते देखील गरजेचे होते असा टोला अप्रत्यक्षरीत्या लगावला.(ekanth shinde on uddhav thackeray opretion)

मनसेने पाठिंबा दिला यावर बोलताना ते म्हणाले, विकासाच्या मुद्द्यावर राज नेहमी सांगत असतात. माझ्याकडे येत असतात. सर्वसामान्य लोकांना न्याय हे आपलं सरकार देईल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे. केंद्रातले मोदी सरकार या देशाला विकासाकडे नेत आहे म्हणून राज ठाकरे, रिपाई, आरपीआय, आठवले गट, जानकर असे अनेक लोक आपल्या बरोबर आहेत विकासाच्या मुद्द्यावर. आणि ही निवडणूक देखील आपण विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत.

अन शिंदे भावनिक झाले...

श्रीकांत यांच्या कार्य अहवालाविषयी बोलताना शिंदे भावनिक झाले. मी आज आपल्यासमोर एक ट्रिपल रोलमध्ये आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता, मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. आणि तुमच्या खासदाराचा पिता म्हणून देखील आपल्या समोर आहे. त्याची गाडी राईट ट्रॅकवर, फुल स्पीड वर आहे. तो एक संसद रत्न आहे या सगळ्याचा मला अभिमान आहे. दहा वर्षाचा पूर्वीचा आणि आत्ताचा श्रीकांत यामध्ये खूप फरक आहे. पहिली निवडणूक लढवून पाच वर्षात कामाच्या माध्यमातून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. जाणीव आणि जबाबदारी असलेला लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहायला समाधान वाटतं.

या अहवालाचे एक एक पानं चाळलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की आपल्या खासदारांनी सर्वांगीण विकासाचे लक्ष ठेवून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आदर्श खासदार आपण दिल्लीला पाठवला यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो.

खासदार डॉ. शिंदे हॅट्रिक करतील...

खासदार शिंदे यांनी 10 वर्षात खूप काम केलीत, विकासकामांसाठी सर्वाधिक निधी आणला आहे. यामुळे येथील जनता त्यांना खासदार म्हणून कधी मतदान करतोय याची वाट पाहते. कल्याण लोकसभा मतदार संघातील खासदार म्हणून त्याला जनतेने स्वीकारलेला आहे. तुमचे आशीर्वाद आणि मोदीजींनी ठेवलेला विश्वास सोबत आहे. त्यामुळे तुमच्या या खासदाराची देखील हॅट्रिक होईल. यामध्ये शंका नाही

असे म्हणत त्यांनी शिंदे हेच उमेदवार असल्याचे अधोरेखित केले.

मतदारसंघात 20 ते 25 वर्षे पुढील व्हिजन ठेवून विकास कामे करावी लागतात. ती केली जात आहेत. अनेक विकास प्रकल्प असतील ही सगळी काम त्यांनी केली. सगळेच काम झाले असं मी म्हणणार नाही. कारण शहर वाढत असतात. त्यांच्या गरजा वाढत असतात. आवश्यक सोयी सुविधा पुरवणे हे लोकप्रतिनिधींच आणि सरकारचा काम आहे.

म्हणून या जिल्ह्यासाठी एमएमआर रिजन साठी एका पाण्याच्या धरणाची आवश्यकता आहे आणि ते धरण देखील आपलं सरकार बांधल्याशिवाय राहणार नाही. उंटावरून शेळ्या हाकणारा हा एकनाथ शिंदे नाही असे देखील शिंदे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com