शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे; आदित्य ठाकरेंकडे कोणती जबाबदारी ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 October 2019

भाजप आणि राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीये. शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शिवसेना आमदारांच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिवसेनेच्या गटनेतेपदाची माळ पडली आहे. तर, सुनील प्रभू यांची शिवसेनेचे मुख्य पक्षप्रतोद म्हणून नेमणूक झाली आहे. 

कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसमध्ये आगीचे थैमान; 65 जणांचा होरपळून मृत्यू

या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे आमदार उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेच्या गटनेतेपदी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातोय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही विचार होत असल्याच्या चर्चा होत्या.  

बाळासाहेबांनी आम्हाला शब्द पाळायला शिकवलं, पण... : संजय राऊत

शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे यांचं देखील नाव पुढे येत होतं. मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर आदित्य यांना विधिमंडळ नेतेपद दिलं जाणार नसल्याचंही बोललं जात होतं. आता आदित्य ठाकरे यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडल्याने आदित्य ठाकरे यांना कोणती महत्त्वाची जबाबदारी मिळणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.

शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदार राज्यपालांना भेटणार : 

आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे सर्व नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम विधिमंडळाचे शिवसेना गट नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आणि सहयोगी आमदार आज दुपारी 3.30 वाजता राजभवनमध्ये जाऊन महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांची आज भेट घेणार आहेत. शिवसेना भवन येथील बैठक संपवून सर्व आमदार थेट राजभवनावर जाणार आहे. 

WebTitle : eknath shinde become legislative party leader of shivsena 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eknath shinde become legislative party leader of shivsena