Eknath Shinde: वाद मिटला, म्हस्केंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले नाईक पित-पुत्र

naresh Mhaske
naresh Mhaske sakal

Thane Loksabha: शिवसेना शिंदे गटाने ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतील नाईक समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. असे असतांना दुसरीकडे शुक्रवारी नरेश म्हस्के यांचे उमेदवार नामनिर्देशन पत्र सादर करताना.(maharashtra Politics)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चक्क माजी मंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक हे दोघांनी हजेरी लावली. त्यामुळे नाराज झालेल्या नाईक समर्थकांसह कुटुंबियांची समजूत काढण्यात यश आल्याचे दिसून आले.(ganesh naik and sanjiv naik)

ठाणे लोकसभेच्या जागेवरून शिवसेना व भाजपात रस्सीखेच सुरू होती. त्यात या जागेवरून दोघांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत होते. त्यातही जागा शिवसेनेला सोडण्यात आली. तर महाराष्ट्र दिनी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर होताच, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर येथील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते.

त्यात नवी मुंबईतील नाईक समर्थकांनी थेट राजीनामे अस्त्र उगरले. त्यामुळे नाराज झालेल्या नाईकांची शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांनी भेट देखील घेतली. मात्र, नाराज झालेल्या नाईक कुटुंबियांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू होते. त्यामुळे नाईक हे काय भूमिका घेतात याची चर्चा सुरू होती.

दरम्यान, शुक्रवारी शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नरेश म्हस्के यांचे उमेदवारी नामनिर्देशन पत्र सादर करताना.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चक्क माजी मंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक हे दोघांनी हजेरी लावली. त्यामुळे नाराज झालेल्या नाईक समर्थकांसह कुटुंबियांची समजूत काढण्यात यश आल्याचे दिसून आले.

...............

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना पक्षाचे ( शिंदे गट) उमेदवार नरेश गणपत म्हस्के यांनी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे दुपारी 12.55 वा, 12.59 वा. 01.03 वा. 01.19 वा असे चार उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com