
नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा केल्यास खपवून घेणार नाही. नालेसफाईची सर्व कामे ७ जून पर्यंत पूर्ण करावीत, नाल्यातून गाळ काढण्याची कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगत नाल्यातून काढलेल्या गाळाची ४८ तासात क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावावी, असेही निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले.