

Thane latest News: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यामुळे ठाण्यात शिवसेनेला आपलं वर्चस्व राखण्यात मदत मिळेल असं म्हटलं जात आहे तर पालकमंत्री पद आपल्याकडे खेचून शिवसेनेला बॅकफूटवर टाकण्याचा भाजपचा मनसुबा हा एकनाथ शिंदे यांनी उधळून लावल्या असल्याची ही चर्चा आहे