
ठाणे : वाहतूक कोंडीने ठाणेकरांना छळले असून, प्रशासनाचा खड्डेमुक्तीचा दावा खोल ठरला आहे. याचा अनुभव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आल्यानंतर त्यांनी सोमवारी (ता. ४) तातडीने सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत संताप व्यक्त केला. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करावा. तसेच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.