Eknath Shinde : आडोशी बोगद्याजवळ कोसळलेल्या दरडीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Eknath Shinde
Eknath Shinde

मुंबई - गेल्या आठवड्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडशी बोगद्याजवळ रात्रीच्या वेळी दरड कोसळली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्ता बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सातत्याने मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ब्लॉक घेण्यात आले होते. आज दरड कोसळलेल्या ठिकाणची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

Eknath Shinde
मुलगा मनी लाँड्रिंगमध्ये अटक पण राष्ट्रपती वडिलांचा हस्तक्षेप करण्यास नकार

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईहून पुण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी जाताना घाटात थांबून दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली. ज्याठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडली, तो डोंगर संरक्षण जाळी लावून सुरक्षित केला असल्याची माहिती एमएसआरडीसीने मुख्यमंत्र्यांना दिली.

Eknath Shinde
Jaipur Mumbai Express Firing : ''हा दहशतवादी हल्ला'', जयपूर एक्स्प्रेसमधील फायरिंगवरुन ओवैसींची भाजपवर टीका

दरम्यान कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. तसेच गरज पडेल तिथे धोकादायक डोंगराचा भाग पाडून तो भाग संरक्षक जाळी टाकून संरक्षित करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. पुण्यात त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या मोदी हे पुण्यात असणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री पुण्यात दाखल झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com