Narayan Rane: "एकनाथ शिंदे सहन करताहेत तोपर्यंत ठीक, एक दिवस..."; नारायण राणेंचा ठाकरेंना इशारा

उद्धव ठाकरे लंडनला गेले त्याची कागदपत्रे आपल्याकडं आहेत, असं सांगत त्यांनी एक खुलासाही केला.
Rane_Shinde_Thackeray
Rane_Shinde_Thackeray

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नेहमीप्रमाणं पत्रकार परिषद घेऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ठाकरेंना चहुबाजूंनी शाब्दिक हल्ला चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत त्यांनी ठाकरेंना इशाराही दिला. त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनाही त्यांनी निशाणा बनवलं. (Eknath Shinde is tolerating everything but one day Narayan Rane warning to Uddhav Thackeray)

Rane_Shinde_Thackeray
Shiv Sena Case: शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर! नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

शिंदे सर्वकाही सहन करताहेत

राणे म्हणाले, "एकनाथ शिंदे सहन करत आहेत तोपर्यंत ठीक आहे. पण एकनाथ शिंदेंना सांगेन एक दिवस असं करा, यांचं मातोश्रीवरच सुरक्षा कवच काढून घ्या. कोणीही काहीही न करता मातोश्रीत बेशुद्ध पडेल हा माणूस, एवढा घाबरट आहे हा" (Latest Marathi News)

Rane_Shinde_Thackeray
Hindi Diwas: 'सनातन'नंतर आता 'हिंदी'बाबत उदयनिधी स्टॅलिन यांचं विधान चर्चेत; अमित शहांच्या भाषणावर दिली प्रतिक्रिया

तीन मार्गदर्शकांचा टेकू

आता सध्या दोन बाहेरचे आणि एक घरातला असे तीन मार्गदर्शक यांना टेकू लावून आहेत, त्यापुढे हे चालतात. संजय राऊत, शरद पवार आणि मातोश्रीवरचा एक. त्यामुळं आम्हाला जास्त बोलायला लावू नका, अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. (Marathi Tajya Batmya)

Rane_Shinde_Thackeray
TRAI New Tariff : केबल आणि DTH चे बिल होणार स्वस्त; 'या' दिवसापासून नवे नियम लागू

लंडनला का जाताहेत हे बाहेर येईल

दरम्यान, उद्धव ठाकरे लंडन का जाताहेत, तिकडं काय काय चाललंय, हे आज ना उद्या बाहेर येईल. काहीही सिक्रेट राहत नाही. बरेचशे कागद माझ्याकडं आले आहेत, मी योग्य जागी ते पोहोचवले आहेत. यानंतर त्यांना सहजासहजी झोप येणार नाही, असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com