Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार नाराज? 'हे' मुद्दे गाजणार, जाणून घ्या शिंदेंच्या बालेकिल्ल्याचा इतिहास

Thane Vidhansabha Election: यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार उभा राहण्याची शक्यता आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

Thane latest News: सलग तीनदा भरघोस मताधिक्यांनी निवडून आलेले आणि ठाण्याला मुख्यमंत्रिपदाचा मान मिळवून देणारे एकनाथ शिंदे यांचा कोपरी- पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ म्हणजे अभेद्य किल्ला ठरला आहे. झपाट्याने विकासाकडे झेप घेणारा त्यांचा मतदारसंघ आहे. येत्या काही काळात क्लस्टरच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कायापालट होत आहे.

धोकादायक इमारतींतील रहिवाशांना हक्काची पक्की घरे मिळणार आहेत. मतदारसंघाशी त्यांची नाळ जुळली आहे; मात्र सध्या हा मतदारसंघ वाहतूक कोंडी आणि त्याहून जास्त कचरा कोंडीने ग्रासला आहे. त्यावरही निवडणुकीआधी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा दोन शिवसेना एकमेकांना भिडणार असल्याचे दिसते.

Eknath Shinde
Thane: ठाणे जिल्ह्यात वाढले तब्बल इतके 'लाख' मतदार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com