
Voteing News: लोकसभा निवडणुकीच्यावेळी राबविण्यात आलेल्या निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत मतदारांच्या संख्येत वाढ होऊन जिल्ह्यातील मतदारांची संख्या ६८ लाख एक हजार २४४ वर पोहोचली. त्यानंतरदेखील आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला होता. या कार्यक्रमांतर्गत मतदारांनी मतदान नोंदणीकडे भर दिल्याने तीन लाख ४५ हजार ४८४ नवीन मतदारांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या मतदारांच्या रांगा लक्षात घेत मतदान केंद्र वाढविण्याचा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्येत साडेतीनशेहून अधिक वाढ झाली आहे. मतदान प्रक्रियेला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.