Eknath Shinde: भाजप समोर एकनाथ शिंदेंची नवी अट? कोणतेही मंत्रीपद नाही तर मगितले 'हे' महत्त्वाचे पद!

Maharashtra News CM News : उपमुख्यमंत्रिपदास राजी करण्याचा भाजपला विश्वास, महाराष्ट्रातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा आपले स्थान वेगळे असून ते लक्षात घ्यावे,
 भाजप १००च्या आत थांबल्यास मुख्यमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला मिळू शकेल, अशी चर्चा तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीत झाली होती.
Eknath Shinde: भाजप समोर एकनाथ शिंदेंची नवी अट? कोणतेही मंत्रीपद नाही तर मगितले 'हे' महत्त्वाचे पद!sakal
Updated on



Latest Mumbai News: अल्पावधीत राज्याचे राजकीय चित्र यशस्वीपणे बदलवून दाखवल्यानंतर मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर समन्वय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी द्या, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत आहे. महाराष्ट्रातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांपेक्षा आपले स्थान वेगळे असून ते लक्षात घ्यावे, असेही शिंदे यांना वाटत असल्याचे समजते.

भाजपचे क्रमांक दोनचे नेते अमित शहा यांनी तुमच्या या योगदानाचा कायम आदर राखला जाईल, असे आश्‍वासन दिले आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना शिंदे यांचा मंत्रिमंडळातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा वाटत असल्याने त्यांची समजूत पटल्यानंतरच नव्या सरकारचा शपथविधी करायचा असल्याने काहीशी दिरंगाई होत आहे. भाजप १००च्या आत थांबल्यास मुख्यमंत्रिपद शिवसेना शिंदे गटाला मिळू शकेल, अशी चर्चा तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीत झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com