.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ठाणे : ठाण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे अनेक प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत. त्यामध्ये मेट्रो ४ व ४ अ ची चाचणी यशस्वी झाल्याने या सेवेचे स्वप्न साकार होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मेट्रो ५ व १२ मुळे ठाणे-कल्याण-नवी मुंबई एकत्रित जोडणी, ईस्टर्न फ्रीवे विस्तार, ठाणे कोस्टल रोड, बोगदा प्रकल्प गतिमान, कोपरी ते पटणी पुल, पटणी–नवी मुंबई एअरपोर्ट एलीव्हेटेड कॉरिडॉर, अवजड वाहनांना शहराबाहेरील मार्ग तयार करुन देण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटून ठाणे वेगवान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.