Shinde Vs Pawar: दादांचं टेन्शन शिंदे वाढवणार? पवारांच्या विधानसभेच्या जागेवर शिवसेनेने केला दावा!

Thane: शिवसैनिकांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठामपणे मांडणार असल्याचे शिंदे गट शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी
Shinde Vs Pawar: दादांचं टेन्शन शिंदे वाढवणार? पवारांच्या विधानसभेच्या जागेवर शिवसेनेने केला दावा!
Updated on

शहापुर तालुक्यातील शिवसैनिकांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठामपणे मांडणार असल्याचे शिंदे गट शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांनी शहापूर तालुक्यातील बामणे येथील अग्रवाल फार्म हाऊस येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करतांना जाहीर केले.

या मेळाव्यात शहापूर विधानसभेची उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी अशी एकमुखी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुकंले असल्याने महायुतीत खळबळ उडाली आहे.शिंदे सरकारच्या योजना प्रभावीपणे तळागाळातील घराघरात पोहचविण्याचे काम शिवसैनिकांनी करण्याचे आवाहन यावेळी प्रकाश पाटील यांनी केले.

Shinde Vs Pawar: दादांचं टेन्शन शिंदे वाढवणार? पवारांच्या विधानसभेच्या जागेवर शिवसेनेने केला दावा!
CM Eknath Shinde : पुण्यातील पूरग्रस्त भागाला मुख्यमंत्र्यांची भेट; खडकवासला धरणातील विसर्गावरुन केलं मोठं विधान

शहापुर विधानसभा निवडणुक लढण्याची आमची तयारी सुरू असून इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली असल्याने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीघेतलेल्या लोकोपयोगी निर्णयामुळे आम्हाला यश मिळणार असून विधानसभा निवडणूक लढणारच असल्याचा ठाम निर्णय यावेळी जिल्हाप्रमुख मारुती ढिर्डे यांनी व्यक्त केला.

यावेळी शिंदे गट शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील,जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे,तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्या फर्डे, संपर्क प्रमुख आकाश सावंत,शहापुर नगरपंचायत च्या गटनेत्या डॉ.कामिनी सावंत,अरुण कासार, निलेश भांडे, वामन गायकर, पद्माकर वेखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखंडे, शिक्षक सेनेचे चिंतामण वेखंडे,कुंदा पाटील , केतकी पवार, अंकिता गोष्टे, संतोष लहाने, सचिन तावडे, किशोर दिनकर, राजेश वेखंडे,निखिल बेडकुळे, प्रसाद झुंजाराराव, यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, शिक्षक सेना, युवा सेना पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिकांनी मेळाव्यास उपस्थिती दर्शवली होती.

Shinde Vs Pawar: दादांचं टेन्शन शिंदे वाढवणार? पवारांच्या विधानसभेच्या जागेवर शिवसेनेने केला दावा!
Eknath Shinde : "माझी हत्या झाली तरी चालेल, पण एकनाथ शिंदेंना सोडणार नाही", सेना आमदाराचा रोख कोणाकडे?

शहापुर विधानसभेत सद्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा कार्यरत आहेत.महायुतीत अजित पवार गट राष्ट्रवादी, शिंदे गट शिवसेना व भाजपा इतर मित्रपक्ष आहेत.

सद्या असलेल्या आमदारांचा त्यांची जागा देण्याचे युतीत ठरले असूनहीं अजित पवार गट राष्ट्रवादीचा आमदार कार्यरत असतांना शिंदे गट शिवसेनेने शहापुर विधानसभेवर दावा केल्याने खळबळ उडाली असून येथे मित्रपक्ष भाजपनेही दावा केल्याने कार्यकर्ते संभ्रमात असून भाजपचे संभाव्य उमेदवार अशोक इरणक यांनी प्रचाराला सुरवात करून सोशल मीडियावर ब्यानरबाजी सुरू केली असून करूकर्त्यांच्या भेटी गाठीवर भर दिला आहे. .महायुतीत ही जागा कोणाला सुटते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

Shinde Vs Pawar: दादांचं टेन्शन शिंदे वाढवणार? पवारांच्या विधानसभेच्या जागेवर शिवसेनेने केला दावा!
Eknath Shinde: "एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात शाहांना दिल्लीत भेटले"; कुणी केली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत चौकशीची मागणी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
Pravah Anathalaya founder Rameshwar Gorde honoured with Loknete Late Ajitdada Pawar Award 2026 for social service
First full size statue of Ajit Pawar in Baramati
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Marathi News Esakal
www.esakal.com