
अमित शहा यांनी पुण्यातील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान जय गुजरात ही घोषणा दिली. अमित शाह हे गुजरातचे आहेत. अशा परिस्थितीत भाजपसमोर एकनाथ शिंदे पूर्णपणे दबले गेले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती. त्यांच्यावर टीकांचा भडीमार सुरू आहे. आता यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.