.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mumbai Latest News: शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवासेनेतर्फे रविवारी (ता. ९) राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ साजरा करण्यात येणार आहे.
या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येकी ६१ सर्वसामान्य नागरिकांचा युवासेनेतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.