
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माझा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असे विधान करून मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याने जवळपास सव्वादोन वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळानंतर शिंदेशाहीला पूर्णविराम मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शिवसेनेत शांतता पसरली असल्याचीही माहिती मिळत आहे.