

crowd for election campaign
Esakal
- बापू सुळे
मुंबई : मुंबईत निवडणूक प्रचार जोर धरू लागलेला असतानाच आता प्रचार महागल्याचे समोर आले आहे. प्रचार फेरी, कॉर्नर सभा, रोड शो करायचा म्हटलं की गर्दी हवीच. गर्दी नसेल तर फ्लॉप शो होतो. त्यामुळे विभागातील मतदार, कार्यकर्त्यांवर जास्त विसंभून न राहता उमेदवारांनी आता ३०-४० पुरुष-महिला आपल्या बखोटीलाच ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे.