

Election Commission Investigate Unopposed Candidate
ESakal
महाराष्ट्रातील २९ नगरपालिकांमध्ये २,८६९ जागांसाठी निवडणूक होत आहे. ३३,६०६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ६६ नगरसेवक आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.