esakal | 'केडीएमटी' समिती सभापतींच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा; सचिव कार्यालयात हालचाली सुरू....
sakal

बोलून बातमी शोधा

'केडीएमटी' समिती सभापतींच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा; सचिव कार्यालयात हालचाली सुरू....
  • परिवहन समिती सभापती निवडणुकीला कोकण आयुक्तांनी दिला हिरवा कंदील .....
  • पिठासिन अधिकारी म्हणून पालघर जिल्हाधिकारी काम पाहणार .....

'केडीएमटी' समिती सभापतींच्या निवडणूकांचा मार्ग मोकळा; सचिव कार्यालयात हालचाली सुरू....

sakal_logo
By
रविंद्र खरात


कल्याण :कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती सभापती ( केडीएमटी ) निवडणूक घेण्यास कोकण आयुक्त यांनी हिरवा कंदील दिला आहे. या निवडणूक प्रक्रियासाठी पिठासिन अधिकारी म्हणून पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे काम पाहणार असून ही कोरोनाचा सावट पाहता निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हा राज्यातील पहिला प्रयोग असून या निवडणूक प्रक्रियासाठी पालिका सचिव संजय जाधव यांनी हालचाली सुरू केल्या आहेत .

अदानी वीज ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता असं भरता येणार वीज बिल

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन ( केडीएमटी ) समितीमध्ये शिवसेना भाजपाची युती असून सत्ता समीकरण नुसार प्रत्येक एक वर्षाने शिवसेना आणि भाजपाच्या परिवहन समिती सदस्याला सभापती पद मिळत होते . सध्या शिवसेनेचे सदस्य मनोज चौधरी हे सभापती असून त्यांचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात आल्याने पालिका सचिव संजय जाधव यांनी पालिका आयुक्त यांच्या माध्यमातून कोकण विभाग आयुक्त यांना प्रस्ताव पाठविला होता त्यात निवडणूक बाबत पीठासीन अधिकारी नेमणूक करण्याची मागणी केली होती .

मात्र मार्च महिन्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्याने निवडणूक प्रक्रिया थांबली होती . मात्र कोकण विभाग आयुक्त यांनी गुरुवार( ता 9 जुलै) रोजी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठविले असून परिवहन समिती सभापती निवडणूक घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. या निवडणुकीला पिठासिन अधिकारी म्हणून पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली आहे. त्यांची वेळ आणि तारीख घेऊन निवडणूक प्रक्रिया घेऊन अहवाल सादर करण्याचा सूचना कोकण विभाग आयुक्त यांनी दिले आहेत. आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार पालिका सचिव संजय जाधव यांनी निवडणूक बाबत हालचाली सुरू केल्या असून पालघर जिल्हाधिकारी तारीख आणि वेळ काय देतात याकडे लक्ष्य लागले आहे .

म्हणे ठाणे स्मार्ट सिटी होणार; इथे तर अंतिमसंस्कारासाठीही होतेय वणवण...

कोरोनाचे सावट ....

कल्याण डोंबिवली शहरात कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढली असल्याने निवडणुकीवर कोरोनाचे सावट असल्याने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सचिव संजय जाधव आणि त्यांच्या सहकारी वर्गाला तारे वरची कसरत करावी लागणार आहे .

भाजपचे पारडे जड 

या निवडणूक मध्ये भाजपचे पारडे जड असून भाजपचे 
परिवहन समिती सदस्य प्रसाद माळी , संजय मोरे , संजय राणे , समवेत अनेक इच्छूक असून भाजपा नेते कुणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ घालतात याकडे लक्ष्य लागले आहे .

---------------------

संपादन - तुषार सोनवणे

loading image
go to top