
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून इच्छुकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवली शहरातील माजी इच्छुक नगरसेवकांनी देखील पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली आहे. कोणी मतदारांना मोफत मध्ये हेअर कलर करून देत आहे तर कोणी स्वस्त दरात टीव्ही, फ्रीज, सायकल, वॉटर फिल्टर यांसारख्या सोयी सुविधा देऊ केल्या जात आहेत. यामुळे मतदारांवर सवलतींचा पाऊस पडत असल्याचे बोलले जात आहे.